Ads

बापाने केली दारूडया मुलाची हत्या

मूल : Murder दारु पिऊन आईसोबत वाद घालत मारहाण करणाऱ्या मुलाला सोडवित असताना वडीलालाही मारहाण केल्याने स्वतःच्या संरक्षणाकरीता बैलबंडीच्या उधारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यु झाला. सदर घटना मूल तालुक्यातील येसगाव येथे सोमवारी रात्री 8 वाजता घडली. चंद्रशेखर नागेंद्र वाढई 35 असे मृतक मुलाचे नांव आहे. तर नागेंद्र पांडुरंग वाढई वय 65 वर्षे असे आरोपी वडीलाचे नांव असुन पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.
Father kills drunk son
मूल तालुक्यातील येसगांव येथील नागेंद्र वाढई यांना तिन मुले आहे. एकाचा काही वर्षापुर्वी मृत्यु झाला. एक मुलगा कामानिमीत्य बाहेरगावी राहात आहे. तर चंद्रशेखर हा अविवाहीत होता, तो आपल्या आई-वडीलासोबत राहात होता. चंद्रशेखर व्यसनाधीन होता. दररोज भांडण करीत आई-वडीलांना मारझोड करायचा. सोमवारी आई भेजगांव येथे आठवडी बाजार करून परत आल्यानंतर दारुच्या नशेत अंगणात झोपलेल्या चंद्रशेखरने आईसोबत भांडण करून मारझोडही केली. घर पेटवुन देण्याची धमकीही देत होता. दरम्यान वडील नागेंद्र वाढई आले. चंद्रशेखरला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांने वडीलांनाही मारहाण सुरु केली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर प्रहार करताच तो जागीच ठार झाला.

घटनेनंतर आरोपी नागेंद्र वाढई यांनीच पोलीस पाटील राजु कोसरे यांच्याशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. परि. पो. उपअधिक्षक तथा मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनखाली नागेंद्र वाढई यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment