चंद्रपूर:- बिहार मधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळांच्या सहकार्याने, न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य शांतता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बौध्दगया महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन समिति चे अध्यक्ष टेंभरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Peace March for the Liberation of Bodh Gaya Mahabodhi Mahavihar on the 25th
त्यांनी सांगितले की बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे. त्या वेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. लहान-मोठे आंदोलनही झाले. बुद्धगया महाविहार हिंदू च्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत बौद्धांना संघर्ष करावा लागेल. भंते सुरई ससाई यांनी बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी 9 टप्प्यांत आंदोलन केले. आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे. या मुद्द्याबाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात, जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत. हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 चा बीटी कायदा रद्द करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने चंद्रपूर जिल्हा पवित्र झाला आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर, भिक्खू संघ आणि बौद्ध लोकांच्या उपस्थितीत बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी एक नवीन मुक्ती चळवळ सुरू करण्यात आली आहे. बौद्धांच्या अस्मिते च्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी होतील अशी माहिती टेंभरे यांनी दिली. हा शांतता मोर्चा यशस्वी करण्यासाठी तहसील व शहर स्तरावर बैठका घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. मोर्चा दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे, छत्री, पाण्याची बाटली आणि दुपट्टा, स्कार्फ सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत भंते अनिरुद्ध, प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे, अ.वी. टेंभरे, किशोर तेलतुंबडे, अनंत बाबरे, अशोक फुलझेले, देशक खोब्रागडे, निर्मला नगराळे, गीता रामटेके, आनंद वनकर, प्रफुल भगत, रुपेश वालकोंडे, उज्वला खोब्रागडे, संदीप सोनोने, धम्मदीप मेश्राम, प्रतीक डोर्लीकर, अॅड राजस खोब्रागडे, दिलिप वावरे, अॅड राजेश वनकर, अॅड रवींद्र मोटघरे, इंजी. चेतन उंदिरवाडे, सुरेश नारनवरे, राजकुमार जवादे, एन. डी. पिपळे, डॉ. टी डी कोसे, प्रेमदास बोरकर, राजेश जनबंधु, हरीदास देवगडे, अनिल आलोने, पंचफुला वेल्हेकर, ज्योती शिवणकर, ज्योति साहारे, नभा वाघमारे, अनिता जोगे, अॅड पूनम उमरे, प्रेरणा करमरकर, वर्षा घडसे, अश्विनी आवळे, वैशाली साठे, अजय धोटे, शंकर वेल्हेकार, दिलीप डांगे, कृष्णदास गजभीये, हर्षल खोबरागडे, यशवंत मुंजमकर, नकुल कांबळे, धर्मेश निकोसे, तेजराज भगत, संतोष डांगे, प्रभूदास मावलीकर, सचिन पाटील, गजभिये, कैलास शेंडे, कैलास बांबोडकर विशाल चिवंडे, सुनील पाटील, शुद्धोधन मेश्राम, नागेश सुखदेवे उपस्थित होते.
-----------------------------------
0 comments:
Post a Comment