Ads

हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराला घुग्घुस पोलिसांनी केली अटक

घुग्घुस: घुग्घुस शहरात हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला घुग्घुस पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला ६ महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले होते अशी माहिती आहे.
Ghugghus police arrest criminal who spread terror with sword in hand
१९ एप्रिल रोजी नाणी उर्फ कार्तिक स्वामी कोडापे राहणार एलसीएच क्वार्टर नकोडा हा सायंकाळी ६ वाजेदरम्यान लता मंगेशकर चौकात हातात तलवार घेऊन स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता, याबाबत घुग्घुस पोलिसांना माहिती मिळताच त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

आरोपी नाणी उर्फ कार्तिक कोडापे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून जानेवारी २०२५ मध्ये चंद्रपूर पोलीस दलाने ६ महिन्याकरिता जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती, मात्र आरोपी हा पोलिसांची नजर चुकवीत हद्दपार कारवाईला न जुमानता घुग्गुस शहरात दाखल झाला व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करायला लागला.

विशेष बाब म्हणजे हद्दपारीची कारवाई आरोपीवर झाली असताना सदर आरोपी घुग्गुस शहरात आला कसा? पोलिसांची गुप्तचर यंत्रणेला त्या आरोपीची चाहूल का बरं लागली नाही असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण झाले आहे.

सदरची यशस्वी कारवाई घुग्घुस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तायवाडे, पोलीस कर्मचारी संजय आतकूलवार, रवि वाभीटकर, नितीन मराठे, महेश भोयर व विजय ढपकस यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment