(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- सिंदेवाही शहर भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपंचायत च्या नियोजनशून्य कारभारामुळे ही स्थिती उद््भवली आहे.
शहरातील पाणीपुरवठा आठवडाभरापासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. काही नागरिकांना, तर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
सिंदेवाही नगरपंचायत
च्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याकडे पाण्यासंबंधी तक्रार केली, तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा विविध भागातील नागरिकांनी दिला आहे..
0 comments:
Post a Comment