राजुरा 15 एप्रिल :
कोहपरा येथील अंबादास पिंगे यांच्या पत्नी स्व. शारदाताई अंबादास पिंगे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त त्यांचा मुलगा नवनाथ पिंगे यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधुन गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रणाली प्रमाणे पारंपारिक पद्धतीला बाजूला सारत ग्रामगीता ग्रंथाचे वितरण केले व आदर्श निर्माण केला.
The Pinge family organized an enlightenment gathering to pay tribute and commemorate the occasion.
सर्वप्रथम ग्रामगीतेतील पहिला अध्याय "देवदर्शन" या अध्यायाचे वाचनातून वातावरण गंभीर व भक्तिमय झाले .स्व.शारदाताई पिंगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नंतर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीतेतील विचार समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने प्रबोधन मेळावा घेण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष. विठ्ठलराव मुसळे यांनी अध्यात्म व विज्ञान यांच्या सहयोगाने प्रत्येकाने आपले जीवन सुखी कसे होईल याचे चिंतन करावे असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले,. प्रमुख वक्ते श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी मोहनदास मेश्राम यांनी ग्रामगीतेतील वंदनीय महाराजांच्या विचाराचे सखोल चिंतन करून मानवी जीवनात माणूस म्हणून जगायचं असेल तर ग्रामगीता किती महत्वाची आहे हे ग्रामगीतेतील अनेक ओव्याचे उदाहरणं देऊन ग्रामगेते चे महत्व विशद केले .श्रीकांत आसुटकर यांनी सामुदायिक प्रार्थनेचे मानवी जीवनातील महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले,. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण वडस्कर यांनी केले . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीहरी साळवे , रवींद्र पिंगे, नरेंद्र पिंगे, कमल पिंगे, वनिता काटोले, कल्पना ताजने, माया ढुमणे, रोहिणी धोटे, पुरुषोत्तम पिंगे , तानभाई पिंगे, नलिनी आसुटकर- पिंगे , गायत्री पिंगे, भारती उलमाले, सुनीता पिंगे, ज्ञानेश्वर मोरे ,सतीश पिंगे ,मंगेश पिंगे ,तसेच पिंगे परिवारातील नातेवाहीक आप्तेष्ट, गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती . याकार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मुसळे यांनी तर आभार आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापीका नलिनी पिंगे यांनी केले. शेवटी वंदनीय महाराजांची राष्ट्रवंदना घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 comments:
Post a Comment