पोभुर्णा:13-14 मे २०२५ रोजी पोभुर्णा, चंद्रपूर येथे एक माती परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबिर सोसायटी कृषी केंद्र, पोभुर्णा येथे सलाम किसान, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्या शेतीसाठी योग्य सल्ला देणे आहे. शिबिरात ICAR प्रमाणित माती परीक्षण किट वापरून मातीची तपासणी केली जाईल, ज्याची सरासरी अचूकता ९०% आहे.
Soil testing camp on 13th May at Pobhurna
पीकानुसार खतांचा सल्ला: माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत असलेल्या पोषक घटकांची अचूक माहिती मिळते. यामुळे खतांचा योग्य वापर करता येतो आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते. माती परीक्षण केल्याने शेतीचे खर्च कमी होतात, पीक उत्पादनात गुणवत्ता येते आणि जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवून ठेवता येते. या शिबिरात शेतकऱ्यांना त्यांच्या मातीतील नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅश, सेंद्रिय कार्बन (OC), विद्युत चालकता (EC), pH पातळी आणि लोह, मॅंगनीज, झिंक, बोरॉन, सल्फर यांसारखे सूक्ष्म अन्नघटक यांची तपशीलवार माहिती दिली जाईल. त्यासोबतच, पीकानुसार खतांचा सल्ला अहवालात नमूद केला जाईल.
डिजिटल अहवाल:
तपासणीचा अहवाल एका दिवसाच्या आत डिजिटल स्वरूपात शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल. शिबिराचा वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत असून, स्थळ सोसायटी कृषी केंद्र, होंडा शोरूमजवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मूल रोड, पोभुर्णा आहे. सर्व शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी पावले उचलावीत.
संपर्क:
अमोल कोहरे - ड्रोन पायलट, सलाम किसान | संपर्क: 8766967584
0 comments:
Post a Comment