चंद्रपूर :- चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीत पुलाखालून आंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली येथील रुग्णालयातील आठ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिस ठाण्याचे एसएचओ प्रदीप पुलारवार त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. याच ठिकाणी महिनाभरापूर्वी चंद्रपूरमधील तीन बहिणींचा बुडून मृत्यू झाला होता.
हे तिन्ही तरुण गडचिरोलीमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. आज सुट्टी असल्याने ते सर्वजण नदीत आंघोळ करायला गेले. त्यावेळी तेथे ८ जण होते, मात्र त्यातील गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे बुडाले. या तरुणांना वाचवण्यासाठी आपत्ती गट आणि पोलिस विभाग अथक परिश्रम घेत आहेत.
0 comments:
Post a Comment