सादिक थैम वरोरा तालुका प्रतिनिधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलासाठी शासना कडून मोफत रेती देणार असल्याची घोषणा केली होती. आज ती घोषणा प्रत्यक्षात आली असून वरोरा येथून याची सुरुवात होत असल्याचा मला खूप आनंद झाला असे आमदार करण देवतळे यांनी आयोजित वाटप उदघाटन वेळी सांगितले. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना आपले हक्काचे घर उभारताना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे, असेही आमदार देवतळे यांनी सांगितले.
आमदार देवतळे यांच्या उपस्थितीत तुळाना १ ह्या रेती घाटावरून लाभार्थ्यांना रेती वितरित करण्यात आली. एका लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. या कार्यक्रमात आमदार देवतळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेतीचे ट्रॅक्टर खाना करण्यात आले. याप्रसंगी लाभार्थी नागरिकांना रेतीच्या टीपीचे ही वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वरोरा तालुक्यात जे घाट घरकुल लाभार्थ्यां करीता राखीव करण्यात आले आहे त्याच घाटातील रेती चे टीपी देण्याचे आदेश देण्यात आली असून तुळाना एक, मारडा, खैरगाव सालोरी, केळी, कोसरसार बोपापुर व पवनी इत्यादी घाट तालुक्यातील ठरवून देण्यात आले आहे.
रॉयल्टी दिल्यानंतर सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत लाभार्थ्यांनी रीतीची उचल करावी लागेल रेती उचल करण्यापूर्वी लाभार्थ्याला अर्ज करावे लागेल व त्याचबरोबर स्वयंघोषणापत्र भरून दिल्यानंतर त्यांना मोफत टीपी दिल्या जाईल असे तहसीलदार योगेश कौटकर यांनी सांगितले. कार्यक्रमास तहसीलदार योगेश कौटकर, नायब तहसीलदार बोरुडे, संवर्ग विकास अधिकारी मुंडकर, अमोल आखाडे
यांची उपस्थिती होती. सध्या रेती घाटांचे लिलाव थांबलेले असल्याने घरकुल मंजूर होऊनही घराचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे अनेक आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. आजच्या कार्यक्रमात प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. ही रेती शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने घाटावरून मोफत दिली जात आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांचा खर्च कमी होणार असून गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे.
तालुक्यातील ४००० लाभार्थ्यांना आठ रेती घाटांवरून रेती दिली जाणार आहे.
शासनाची ही योजना म्हणजे गरजूंना मदतीचा हात देण्याचा एक चांगला उपक्रम आहे. आजचा दिवस वरोरा व भद्रावती तालुक्यातील गरजूसाठी महत्त्वाचा असून शासनाच्या घरकुल योजनेतून आपले घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी ही मोठी संधी आहे. 'घरकुल योजना' फक्त एका घरापुरती मर्यादित नाही, तर ती कुटुंबाचे भविष्य घडवते. स्वताचे घर म्हणजे स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. घरकुल म्हणजे चार भिती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची स्वप्नपूर्ती आहे. त्यामुळे हे घर उभे राहण्यासाठी शासनाने आपली साथ देणेही जबाबदारी आहे. शासन गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असे यावेळी आमदार करण देवतळे यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment