चंद्रपुर :-जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटना, घरफोडी, मोटर सायकल चोरीचे प्रमाण पाहता स्थानिक गुन्हे शाखेस तसेच जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी करणार्या गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, यांनी दिले होते.त्यांच्या निर्देशानुसार अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वातजिल्ह्यात चोरी, घरफोडी , मो. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेर बंद करण्या करिता शोध मोहीम राबवून गुन्हेगार प्रवुत्तीच्या इसमांना पायबंद घालण्यात येत आहे.crime News
motorcycle thieves arrested, 3 stolen motorcycles recovered
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाला दिनांक ०८/०५/२०२५ रोजी बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर येथे बिना नंबर प्लेटची मोटार सायकल विक्री करीता ग्राहकाचे शोधात फिरत असल्याचे गोपनिय माहिती वरुन सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपी नामे (१) शानु देविदास चिकराम वय २० वर्ष रा. टेकडी ता. मुल जि. चंद्रपूर ह.मु. लोहारा चंद्रपूर (२) नचिकेत चतुर ठाकरे वय २२ वर्ष रा. भेजगांव ता. मुल जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन कौशल्यपुर्ण तपास करुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांचे कडुन वेगवेगळया ठिकाणाहुन चोरलेल्या एकुण ३ मोटार सायकल किंमत १,७०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा / नितीन कुरेकार, सुरेंद्र महतो, चेतन गज्जलावार, पोअं / गोपाल आतकुलवार, प्रफुल्ल गारघाटे, चापोहवा दिनेश अराडे, चापोशि मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे
0 comments:
Post a Comment