जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई भद्रावती महसूल विभागाद्वारे दिनांक नऊ रोज शुक्रवारला सकाळी नऊ वाजता मानोरा गावाजवळ करण्यात आली.
एम एच 29 वी 17 13 या क्रमांकाचा ट्रॅक्टर मांगली वरून भद्रावतीकडे अवैध रेती वाहतूक करताना ग्राम महसूल अधिकारी अनिल शृंगारे यांनाआढळून आला.सदर ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही पुरावा आढळून न आल्याने या ट्रॅक्टरवर कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.सदर ट्रॅक्टर मांगली येथील अक्षय बोढेकर यांच्या मालकीचा आहे. तहसीलदार राजेश भांडारकर यांनी अवैध रेती विरोधात मोहीम तीव्र केल्याने रेती तस्करात चांगली धडकी भरली आहे. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी अनिल दडमल,ग्राम महसूल अधिकारी अनिल शृंगारे, खुशाल मस्के आदींनी केली.
Tractor used for illegal sand transportation seized.
0 comments:
Post a Comment