Ads

जावयाने सासऱ्याचा केला खून

सादिक थैम प्रतिनिधी वरोरा:
आरोपी जावई कोणताही कामधंदा करीत नसून नेहमी मुलीसोबत भांडण करायचा त्यामुळे मुलीला त्रास देऊ नको असे मृतक म्हणायचा.आरोपीने रागाचे भरात मृतक वृध्द सासऱ्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत मृतक गंभीर जखमी झाला.उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे कळते. Murder
Son-in-law murdered father-in-law
मृतक चे नाव मुकुंदा हनुमंत देवकर,वय ७० वर्ष,आरोपींचे नाव दासा लक्ष्मण इटकर वय ३७ वर्ष,दोन्ही राहणार सरदार पटेल वॉर्ड, वडारपुरा ,वरोरा येथील रहिवाशी आहे.घटना २१ मे २०२५ ला दुपारी १.३० ते २.०० वाजताचे दरम्यान घडली.
शहरातील सरदार पटेल वॉर्डातील वडारपुऱ्या मध्ये सासरे व जावयाचे कुटुंब राहतात.जावई आणि सासऱ्याचे कुटुंब एकाच घरात राहत असल्याची माहिती आहे.मृतक सासरे घरात जेवण करीत असताना आरोपी जावई दासा लक्ष्मण इटकर हा कोणताही कामधंदा करीत नव्हता आणि आपल्या पत्नीसोबत नेहमीच भांडण करायचा त्यामुळे मृतक सासरे मुकुंदा हनुमंत देवकर याने मुलीला त्रास देऊ नको असे म्हटले.त्यावरून आरोपीने मृतकाला काठीने मारले.त्यामध्ये मृतक गंभीर जखमी झाला.उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे कळते.
पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment