Ads

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींसाठी निवास,भोजन आणि शिक्षणाची मोफत संधी

चंद्रपुर :- भारतीय जैन संघटना (बीजेएस)BJS यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही, महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये प्रवेश देऊन १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्णतः मोफत दिले जाणार आहे. तसेच भोजन, निवास, वैद्यकीय व इत्यादी सुविधा शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत मोफत उपलब्ध करण्यात येतील.
Free accommodation, food and education for children of suicide-affected farmer families
यासाठी इयत्ता ५ वी व ६ वी मध्ये १०० मुला - मुलींना प्रवेश देण्यात येणार असून, दिनांक ७ जून २०२५ पर्यंत अर्ज वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे-नगर रोड, बकुरी फाटा, पुणे येथे सादर करण्यात यावे. या साठी आवश्यक कागदपत्र व पालकांचे संमती पत्र अनिवार्य असून, इतर माहिती साठी बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक श्री सुरेश साळुंके - ९४२३ ०७४ २३४, वस्तीगृह व्यवस्थापक, श्री साईनाथ रापतवार - ९९७० ००१ ०११, प्रमुख अधीक्षक, श्री रामदास औटे - ९४२० ७८६ २१२, आणि सौ. सविता सुतार - ९८६० १०५ ३२६ यांच्याशी संपर्क साधावा.बीजेएसचे संस्थापक श्री.शांतिलालजी मुथ्था हे गेली ४० वर्षांपासून अशा प्रकारचे सामाजिक कार्य अविरत करीत आहेत. लातूर (किल्लारी) भूकंपातून १२०० मुलांना पुणे येथे आणून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी या कार्याची सुरुवात केली होती. १९९७ सालापासून मेळघाट परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना पुणे येथे शिक्षणासाठी आणून त्यांना शिक्षणाबरोबरच सक्षम नागरिक बनविण्यामध्ये बीजेएसने यश मिळवले आहे.तसेच कोविड काळातील अनाथ मुलांची जवाबदारी देखील घेण्यात आली होती, आत्तापर्यंत ३००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन बीजेएसने केले असून, या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी पिढीचे चेंज एजंट बनविण्यामध्ये बीजेएसला यश प्राप्त झाले आहे. आज आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुला-मुलीना ही सुविधा प्राप्त करून देण्यासाठी बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नंदकिशोर साखला, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन, सह संपूर्ण बीजेएसची टीम कार्यरत आहे.राज्यातील आत्महत्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आपली मुल व मुली 12 वि पर्यंतच्या शिक्षणा करिता आमच्या कडे सोपवावी असे भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतनभाई शहा व राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, चंद्रपुर यांनी आव्हान केले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment