Ads

चोर बीटी बियाणे न वापरण्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून आवाहन.

जावेद शेख भद्रावती:-येत्या काळात खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. तालुक्यात धानपिक, सोयाबीन व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते. या काळात अनेक शेतकरी राज्यात बंदी असलेले चोर बीटी बियाणे परराज्यातून आणून त्याचा वापर करतात. मात्र सदर बियाणे अधिकृत नसल्याने त्याची उगवण न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते व बिल नसल्याने त्याची दादही मागता येत नाही.
Appeal from the Taluka Agriculture Office not to use Duplicate Bt seeds.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चोर बिटी बियाणे न वापरता परवानाधारक कृषी केंद्रातूनच अधिकृत बियाणे खरेदी करावे व बियाण्याचे बिल व त्याचे लेबल सांभाळून ठेवावे असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. एखाद्या शेतकऱ्याकडून चोर बीटी बियाणे वापरल्याची माहिती मिळताच तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राखण्यात येईल असे आवाहनही सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment