Without a ghat auction, the river is Digged
कोरपणा तालुक्यातील वनोजा झोटिंग अकोला कोठोडा परसोडा घाटावर गेल्या चार-पाच महिन्यापासून रेती तस्करी मध्ये धुमाकाळ घालत चोरीच्या मार्गाने वाळू वाहतूक करून कोट्यावधीच्या शासनाच्या स्वामित्व धनाला चुना लावीत सन 2025 सुगीचे उगवल्याचे नवीन तस्करांची फळी उभी झाली व बिनधास्त आनंद उत्साहात नवीन नवीन ट्रॅक्टर खरेदी करून तस्करांनी आपला व्यवसायाचा मोर्चा नदी घाटाकडे नेऊन जोमाने व्यवसाय थाटला मात्र महसूल प्रशासन कोमात आहे की तस्करांच्यापाठीशी खंबीर उभा आहे का असा प्रश्न नागरिकांना उपस्थित करीत गावागावात वाळु तस्करीची चर्चा रंगू लागलीएवढेच नव्हे तर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ज्या पोलीस विभागाकडे आहे या काही महाभागांनीपोलीस कर्मचारी असताना भाड्याने किंवा नातेवाईकांच्या ट्रॅक्टर घेऊन तस्करांना बळ देत असल्याने कारवाईची काय भीती यावरून कुंपणच शेत खात असल्यामुळे कारवाईचा प्रश्न कुठे येतो कारण तस्करांचे अर्धे अधिक काम लोकेशनचे यांच्याकडूनच पार पाडल्या जात असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची आणि या तोऱ्यातूनच तस्करांची लाबी तयार होऊन कोरपणा तालुक्यातील अनेक नदी घाटावर धुमाकूळ घातला आहे रात्रंदिवस कायद्याच्या चाकोरी बाहेर जाऊन जेसीपी नदीमध्ये लावून वाळू तस्करीहोत असताना महसूल प्रशासन पोलीस प्रशासनातील सक्षम अधिकारी अनभिज्ञ कसे यांना या सर्व कारभाराची माहिती अशी कशी नाही सर्व घाट नियमबाह्य पोखरून काढले साज्यातील मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी सुरू असलेल्या घडामोडी कशा काय माहित नाही गेल्या चार महिन्यापासून एक तरी घाटावर जाऊन स्थळ पंचनामा पाहणी किंवा वरिष्ठाला या घटना अवगत करून देणे हे यांचे कर्तव्य नव्हते का एकीकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर इंस्टाग्रामफेसबुक वर डॉन के इलाके मेकोई डर नही लुटो खजाना लुटे चे गाणे उत्खनन करताना शूटिंग करून वायरल केल्या जाते तर एवढ्या प्रमाणात तस्करी होत असताना पोलिसांना कळविले तर ते म्हणतात हे काम महसूल विभागाचा आहे आणि महसूल अधिकारी स्विच ऑफ क्षेत्र बाहेर नेहमी असल्याने व ही जबाबदारी तलाठी कडे दिली असल्याचे सांगून मोकळे होतात मग कारवाई करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची कारवाई होत नसल्याने तस्करांचे हौसले बुलंद आहे 1 मार्च 2025 पासून 20 मे 2025 म्हणजे 80 दिवसात महसूल विभागाची एवढी यंत्रणा खालच्या पातळीपासून वरपर्यंत असताना फक्त दहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले म्हणजे कोळशात हात काळे तर होत नाही ना ज्या साज्यात रेती चोरी अवैध साठवणूक होत असताना व पूर्वीपेक्षा तलाठ्यांचे भौगोलिक क्षेत्र कमी होऊन नवीन भौगोलिक क्षेत्रात कमी गावात जबाबदारी मोजकी गावे समाजामध्ये असताना ग्राम महसूल अधिकाऱ्यांना माहिती नसावी यावर नागरिकांचा विश्वास बसणार नाही तहसीलदार रोडने वाहन फिरवल्याने रेती तस्करावर आळा बसणार का महसूल विभाग नदी पोखरून रेती वाहतुकीचे मौक्का पंचनामे उत्खननक्षेत्राचे फोटो व्हिडिओ जीपीएस लोकेशन शूटिंग करून कारवाईचा बडगा उभारणार का रेती तस्करांचे मुस्के आवडणार का की आगामी पावसाच्या येणाऱ्या सरी बरोबर हे पाप लपून पुराच्या पाण्यातूनवाहून जाणार का अशी चर्चा लोकांमध्ये असून तत्परतेने पावसापूर्वी महसूल विभाग याबद्दल झालेल्या स्वामित्व धनाची नुकसानीची दखल घेऊन चौकशी करून कारवाई करणार का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले असून यामध्ये -काही कर्मचारी सुद्धा तस्करांना मदत करत असल्याची नाव न सांगण्याच्या अटीवर एका गावच्या व्यक्तीने माहिती दिली आहे बघूया आगे आगे होता है क्या?घाट लिलाव नसताना, नदी पोखरली
(चंद्रपुर प्रतिनिधि ):चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावरील असलेल्या गावालगत नदी पोखरून रेती तस्करी खुलेआम होत असताना साज्याचे तलाठी ग्राम महसूल अधिकारी कोतवाल गाव पातळीचे पोलीस पाटील यांना रेती तस्करीची कल्पना नसणे हे नवलच
0 comments:
Post a Comment