चंद्रपुर :-शहरातील जनता कॉलेज परिसरात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत प्रसिद्ध ‘जेबी आर्ट अँड स्टेशनरी’ हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत अंदाजे ५० लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दुकान मालकाला आर्थिक मदत केली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर शहरातील व्यावसायिक व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी दुकानमालक धकाते यांची भेट घेत घटनेची माहिती घेतली आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, फायर ब्रिगेडने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान भस्मसात झाले होते. शहरातील व्यावसायिक वर्गात या घटनेमुळे चिंता पसरली आहे. सुरक्षितता आणि दुकानांच्या संरक्षक उपाययोजनांबाबत नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनीही अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि व्यापारी वर्गाने संयुक्तरित्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुख, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्याम हेडाऊ यांचीही उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment