भद्रावती, गेले अनेक दिवसापासून तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात अवैद्य रेती करणाऱ्या माफियांना कारवाईच्या बडगा सतत सुरू आहे यामुळे रेती तस्करी करणाऱ्या येथे माफियांचे चांगले धाबे दणाणले आहे प्रत्यदर्शी सूत्र करून माहिती मिळाली की तालुक्यातील चोरा वायगाव येथीलकाही अंतरावर मंदिराच्या मागे मुरूम तस्करी पहाटे चार वाजता पासून जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून ट्रॅक्टर च्या साह्याने सुरू आहे
सदर मुरूम तस्कर1500 ते 2000 भावात मुरूम विक्री करीत आहे घरकुल वाल्यांना यामुळे शासनाचे लाखोचे महसूल बुडण्याची शक्यता आहे.काही सुज्ञ नागरिकांनी याची माहिती प्रशासनातील महसूल विभाग व वन विभाग यांना फोन द्वारे दिली असता मोबाईल स्विच ऑफ सांगण्यात आले जेसीबीच्या साह्याने अवैध मुरूम तस्करी ही तस्करी मुजोर म्हणावी ती संबंधिताच्या आशीर्वाद हे कळायला मार्गच नाही मुरूमच्या उपसा करून रात्रभर जेसीबीच्या सहाय्याने संबंधित क्षेत्राचे मंडळ अधिकारी, तलाठी, व बीट जमदार,यापैकी एकाला हे चित्र दिसत नसेल का? हा मात्र संशोधनाच्या विषय ठरत आहे या मुजोर मुरूम तस्करीच्या मुसक्या आवडण्याची गरज आहे मात्र कारवाई करणाऱ्या डोळ्यावर पट्टी असेल तर कारवाई करणार कोण ?असे एक ना एक प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करत आहे याच पार्श्वभूमीवर भद्रावती महसूल व पोलीस विभागाने लक्ष देऊन शासनाचे नियम ढाब्यावर बसवून चोरावायगाव येथून होणारी मुरूम तस्करीवर अंकुश लावण्यासाठी व पर्यावरणाच्या ऱ्हास वाचवावा अशी मागणी काही पर्यावरण प्रेमी नी केली आहे जिल्हाधिकारी महोदय यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी तालुक्यातील पर्यावरण प्रेमी करीत असून याकडे कारवाईचे लक्ष लागले आहे
0 comments:
Post a Comment