सादिक थैम तालुका प्रतिनिधी वरोरा:पावसाळा सुरू होत असून शेतीचा हंगाम सुरू आहे.मोसमी वारे विदर्भात येण्यापूर्वीच विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी बरसत आहे.शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून वखरणी ,नांगरणी करून काळया मातीत बियाणे टाकण्यासाठी शेती सज्ज ठेवण्याचे कामात बळीराजा व्यस्त आहे.
परंतु शेतीचा हंगाम सुरू असताना आबमक्ता येथील नत्थु संभा नागरकर यांच्या कडे अवघी दोन एकर शेती असून शेतीची मशागत करण्यासाठी बैल जोडी होती.परंतु १९ मे २०२५ ला अचानक विजेच्या कडकडाट सह पाऊस आला.आणि नेमकी वीज पीडित शेतकऱ्याच्या शेतात बांधून असलेल्या एका बैलावर पडली व तो जागीच ठार झाला असून ऐन हंगामात ७९ हजाराचे शेतकऱ्याचे नुकसान झाले.जेमतेम परिस्थितीत चालू हंगामात बियाणे ,खत घेईल की बैल घेईल.पीडित शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.
0 comments:
Post a Comment