Ads

रेतीची माहिती दिल्याच्या संशयावरून 34 वर्षीय इसमास मारहाण.

तालुका प्रतिनिधी जावेद शेख भद्रावती :-
रेती बद्दल शासकीय अधिकाऱ्यास माहिती दिल्याच्या संशयावरून एका 34 वर्षीय युवकास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चंदनखेडा येथे दिनांक 22 रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
34-year-old Ismas beaten up on suspicion of giving information about sand.
अनिल गायकवाड वय 34 वर्षे, राहणार चंदनखेडा असे या मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली आहे. अनिल गायकवाड हा गावातील एका पानठेल्या जवळ बसून असता गावातील मारुती गायकवाड, गजू रणदिवे व रामू गायकवाड यांनी लाथा बुक्क्यांनी व लोखंडी राडच्या सहाय्याने अनिल गायकवाड याला अमानुषपणे मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment