Ads

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग शिक्षकांचा सत्कार.

राजुरा २२ जुन :-
संपूर्ण देशात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. फिटनेस झुंबा व योगा क्लास मध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा गडचांदुर तर्फे योग शिक्षक विजय शेट्टी व शीला शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या तिन वर्षांपासून त्यांनी योगा व झुंबा क्लास मध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण आणि योगा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तसेच जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
Yoga teachers felicitated on International Yoga Day.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल धोटे, कोरपना तालुका महिला संघटीका यांनी केले. प्रास्तावीक स्मिता विरुटकर यांनी तर आभारप्रदर्शन अरुणा सालवटकर, कोरपना तालुका महिला उपाध्यक्षा यांनी केले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपना तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, सचिव विजया नामेवार, महीला संघटीका सुलभा कुरेकर, स्मिता विरुटकर व योगा क्लास च्या महीला उपस्थीत होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment