जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी
(भद्रावती) :-जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील 12 गड किल्ल्यांचा समावेश करणारे, विधानसभेमध्ये जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, गोर गरिबांचे कैवारी,कर्तव्यदक्ष ,विकास पुरुष , आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसेवा मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावती चे वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व मिठाई वितरण सोहळ्याचे आयोजन लोकमान्य विद्यालयाचे भव्य सभागृहात करण्यात आले आहे.
MLA Sudhirbhau Mangantiwar's birthday will be celebrated by distributing school supplies and sweets.
दिनांक 30 जुलै 2025 ला सकाळी ठीक 9.00 वाजता विठ्ठल मंदिर देवस्थान किल्ला वॉर्ड येथे विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन करून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दीर्घायुष्य लाभो व पुढे सुद्धा भाऊंच्या हातून समाज हिताचे कार्य घडून जनतेच्या समस्या भाऊच्या माध्यमातून पूर्ण होवोत अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी 4.00 वाजता लोकमान्य विद्यालयाचे भव्य सभागृहामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण व मिठाई वितरण सोहळा पार पडणार आहे या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment