चंद्रपूर | 09 ऑगस्ट 2025
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उप पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त कारवाईत पोडसा (ता. गोंडपिपरी) येथील मनोरंजन क्लब वर धाड टाकून अनधिकृत जुगार अड्डा उध्वस्त करण्यात आलाPodsa gambling scandal exposed! Police crackdown on entertainment clubs
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर शाखा पोडसा (रजि. नं. एफ-0014811) येथे चालक महेश्वर गोपालनायक अजमेरा (वय 42, रा. चिंताकुंडा, ता. शिरपूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा) याने संयोजकाच्या संगनमताने परवाना अटींचे उल्लंघन करत जुगार खेळवला.
कारवाईदरम्यान डीव्हीआर, ताशपत्ते, नाणी, रजिस्टर असा एकूण ₹3,450 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. क्लब चालक, संयोजक, जुगार खेळणारे व अपप्रेरणा देणारे आरोपी यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
🚔 पोलिसांचे आवाहन:
नागरिकांनी परिसरात अशा प्रकारचे बेकायदेशीर जुगार अड्डे असल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर (डायल 112) वर संपर्क साधावा.
0 comments:
Post a Comment