Ads

भद्रावतीत शिवसेनेतर्फे १६ ऑगस्टला भव्य दहीहंडी महोत्सव

भद्रावती : शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना वरोरा-भद्रावतीच्या वतीने भद्रावती शहरात भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, बंगाली कॅम्प येथे पार पडणार आहे.
Shiv Sena to hold grand Dahi Handi festival in Bhadravati on August 16
महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात लावणी नृत्यकलावंत उज्वला पुणेकर आणि विनोदी अँकर परेश आपल्या कलाविष्काराने रंगत आणणार आहेत.

दहीहंडी महोत्सवात दहीहंडी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, ‘रिल्स’ स्पर्धा यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भद्रावतीतील महिला भजन मंडळांचा आकर्षक भेटवस्तूंनी सत्कार करण्यात येईल. या सर्व स्पर्धांसाठी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे.

हा महोत्सव शिवसेना वरोरा-भद्रावतीतील नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून होत असून, आयोजकांनी सर्व नागरिकांना या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment