चिमुर– चिमुर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत घरफोडी प्रकरण उघडकीस आणत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. crime news
Chimur police take swift action – house burglary case solved in two days,
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी कन्हाळगाव येथील रामदास वाघमारे हे पत्नीसमवेत शेतकामासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1.40 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून चिमुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गुप्तहेर जाळे सक्रिय केले. गुप्त माहितीच्या आधारे संशयित रोशन बबन वाघमारे (वय 33, रा. कन्हाळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 2 सोन्याच्या बांगड्या (वजन 40.50 ग्रॅम, किंमत 80,000/-), एक सोन्याचे मंगळसूत्र (वजन 20 ग्रॅम, किंमत 40,000/-) आणि 20,000/- रुपये रोख असा एकूण 1,40,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक इश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील स.फौ. विलास निमगडे, पो.अं. रोहित तुमसरे, सचिन खामनकर, सोनु व सचिन साठे यांनी केली.
0 comments:
Post a Comment