चंद्रपूर, दि. 16 :
घरफोड्या करून दागिने व रोख रक्कम लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूरमध्ये पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल ₹86,270/- किमतीचे सोन्या–चांदीचे दागिने व नगदी जप्त करण्यात आले आहेत.Burglary busted: Two thieves arrested
खात्रीशीर माहितीवर सापळा
रामनगर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी एक इसम निमवाटिका, रयतवारी कॉलरी परिसरात येणार आहे. पथकाने सापळा रचून त्याला पकडले. अंगझडतीत मौल्यवान दागिने व नगदी हस्तगत झाली.
चौकशीत कबुली
सखोल चौकशीत आरोपींनी वरोरा व भद्रावतीतील घरफोड्यांची कबुली दिली. यामुळे 3 गुन्ह्यांचा छडा उलगडला आहे.
अटक आरोपी
रामण्णा दशरथ दांडेकर (29, रा. वरोरा)
अरुण लिलाधर साहा (32, मूळगाव सीतामढी, बिहार – सध्या मुक्काम चंद्रपूर)
फरार आरोपी
अरविंद सातपुते (रा. वरोरा)
अर्जुन दांडेकर (रा. ब्रम्हपुरी)
कारवाई करणारे पथक
पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. सर्वेश बेलसरे, पोहवा. नितीन साळवे, नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, गजानन मडावी, पो.अ. अमोल सावे, प्रसाद धुळगंडे (उपविभाग चिमुर, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर).
0 comments:
Post a Comment