जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती:-
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व जिल्ह्य परिषदेच्या मार्गदर्शनात पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांचा शुभारंभ नंदोरी येथे घेऊन तालुक्यातील 70 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन राज्यस्तरिय लाईव्हप्रक्षेपण घेण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटक व अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, प्रमुख अतिथी सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार, सरपंच मंगेश भोयर,सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र जिवतोडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आसुटकर, उपसरपंच सौ.उषा लांबट, कीशोर उमरे,शरद खामनकर, भानुदास ढवस,जयश्री एकरे, विस्तार अधिकारी प्रकाश पारखी,प्रणाली भागवत,ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लोंढे होते.प्रथम मुख्य मार्गावर साफसफाई करुन स्व च्छतेची शपथ घेण्यातआली.राष्ट्रसंत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दिव्पप्रज्वलन करण्यात येऊन स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागात ग्रामपंचायतची कार्यक्षमता वाढविणे,सुशासन प्रशासन,मनरेगा योजना अभिसरण,ग्राम पातळीवरील संख्या सक्षमीकरण,उपजिवीका विकास व सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार यांनी सामाजिक न्याय, सहभाग व श्रमदानातून लोकसहभाग व नरेंद्र जिवतोडे यांनी स्वच्छता ही सेवा मोहीम याविषयी,ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लोंढे यांनी पांदण रस्त्याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन केले.यावेळी आदिशक्ती समीती स्थापन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मंगेश भोयर संचालन शिक्षक अमीत गजभिये आभार ग्रामपंचायत अधिकारी विकास तेलमासरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, एपीओ सुरज खोडे,राहुल घायवनकर,सरपंच,ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment