राजुरा ११ सप्टेंबर :- राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशनलगत असलेल्या धानोरा गावात ९ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजता सुमारास गुरुदास लखू टेकाम (वय ३७) या मजुराचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुदास टेकाम हे गावाशेजारी असलेल्या तलावाजवळ गेले असताना पाण्यात बुडाले. स्थानिकांनी ही बाब लक्षात घेताच तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेची माहिती विरुर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे हलवण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, पोलीस हवालदार विजय मुंडे व बिबीषण खटके हे करीत आहेत.
गुरुदास टेकाम यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 comments:
Post a Comment