Ads

भद्रावती तालुक्यात महसुल लोकअदालतीचे आयोजन

भद्रावती (जावेद शेख) – महाराष्ट्र शासनाचे दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजीचे शासन निर्णय व मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी भद्रावती तालुक्यात महसुल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
Organized Revenue Lok Adalat in Bhadravati Taluka
ही लोकअदालती तहसिल कार्यालय भद्रावती तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय घोडपेठ, भद्रावती, नंदोरी, मांगली, चंदनखेडा व मुधोली या महसुल मंडळांत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार आहे. नागरिकांनी आपल्यासंबंधीची तक्रार, समस्या अथवा प्रलंबित अर्ज या लोकअदालतीत दाखल करून दिल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही होणार असल्याचे तहसिल कार्यालयाने कळविले आहे.

या लोकअदालतीत महसुल विभागाशी निगडित विविध प्रश्नांवर सुनावणी व तातडीने निवारण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने –

महसुल विषयक तक्रारींचे निराकरण
महसुल स्तरावरील प्रलंबित फेरफार
रस्ते विषयक प्रश्न
संगणकीकृत सातबारा अभिलेखातील त्रुटी दुरुस्ती
क्षेत्रफळ व नाव दुरुस्ती
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण
अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी व इतर शासकीय योजनेशी संबंधित प्रश्न

यांसंबंधी अर्जांची छाननी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल. तहसिलदार श्री. राजेश भांडारकर स्वतः तहसिल कार्यालय भद्रावती येथे लोकअदालतीत उपस्थित राहून सुनावणी घेणार आहेत.

लोकअदालतीच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी शासन गंभीर असून तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री. भांडारकर यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment