चंद्रपूर 17 सप्टेंबर - चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणुन श्रीमती विद्या गायकवाड रुजू झाल्या असुन बुधवार 17 सप्टेंबर रोजी त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील, उपायुक्त श्री.मंगेश खवले,उपायुक्त श्री.संदीप चिद्रवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपीन पालीवाल हे वैद्यकीय कारणाने रजेवर असल्याने नगर परिषद प्रशासन विभागाच्या जिल्हा सहआयुक्त म्हणुन कार्यरत असणाऱ्या श्रीमती विद्या गायकवाड यांना चंद्रपूर मनपा प्रशासनाचे आयुक्त म्हणुन अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे.
मनपाच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनपाच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. कामे ही निश्चित वेळेतच व्हायला हवी याबाबत आपण आग्रही असुन गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मनपाचे सर्व विभागप्रमुख,अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
0 comments:
Post a Comment