चंद्रपूर : सततच्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने आज सकाळी ईरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. मंगळवारी सकाळी ७ वाजता प्रशासनाने विसर्गात वाढ केली असून धरणातील तीन गेट १ मीटर तर चार गेट ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहेत.
Seven gates of Irai Dam opened
धरण परिसर व नदीकाठच्या भागांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीपात्र, नाले व धरणाखालील भागात जाणे टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ईरई धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ होणार असून परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाने सज्जता दाखवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेकडे जात असल्याने विसर्ग सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 comments:
Post a Comment