Ads

अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार

भद्रावती : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानणारे आ. श्री. मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
Sudhir Mungantiwar* immediately rushed to the accident victims.
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेसाठी अर्पण केला आहे, याची प्रचिती भद्रावती येथे घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आली. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम (रा.विसापूर) जखमी झाले. त्याच वेळी नेमके त्या मार्गावरून आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.

अपघातग्रस्तांची अवस्था पाहताच, ‘माणसाचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च कर्तव्य’ या भावनेतून क्षणाचाही विलंब न करता आ. मुनगंटीवार यांनी आपला ताफा तात्काळ थांबवला. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तात्काळ पुढाकारामुळे अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा आणि महामंत्री डॉ मंगेशजी गुलवाडे यांनीही तत्परतेने जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी नेण्याची मदत केली.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, ग्रामविकासासाठी सततचे प्रयत्न अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी जनतेच्या सेवेला नवी दिशा दिली आहे. त्यामुळेच “जनसेवा हीच ईश्वरसेवा” ही त्यांची जीवनव्रती भूमिका जनतेच्या मनाला स्पर्श करत राहते.जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, संकटात मदतीचा हात देणारे संवेदनशील नेते म्हणजे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, हे पुन्हा एकदा यानिमित्ताने सिद्ध झाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment