चंद्रपूर :
जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले. पोलिसांनी चोरीस गेलेले पेंट व ईलेक्ट्रीक साहित्य, ऑटो रिक्षा, दुचाकीसह एकूण ३,३८,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Two innkeepers caught by Chandrapur police
मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आरोपींची नावे :
१) शादाब शब्बीर सैफी (२९), रा. नेरी वार्ड, दुर्गापूर
२) सोहेल कादीर सय्यद (२८), रा. नेरी वार्ड, दुर्गापूर
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि. दिपक कांक्रेडवार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. सुनिल गौरकार, पोहवा. सुभाष गोहोकार, रजनीकांत पुष्ठावार, सतिश अवधरे, दिपक डोंगरे, इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, चापोअं. मिलींद टेकाम आदींचा सहभाग होता.
👉 ही धडक मोहीम चंद्रपूर पोलीसांच्या दक्षतेचे प्रतीक मानली जात आहे.
0 comments:
Post a Comment