चंद्रपूर (सचिन पाटील) :
स्थानिक गांधी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या , बरि, राजाभाऊ खोबरागडे मुख्य जन्मशताब्दी महोत्सवाचे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोबरागडे व देशक खोबरागडे यांनी दिली.
Various programs of the birth centenary festival of Barister Rajabhau Khobragade: release of postage stamps, awareness meetings, seminars and lively cultural events
डाक तिकिट विमोचन सोहळा
महोत्सवाचा प्रारंभ सायंकाळी ४:०० वाजता डाक विभाग, भारत सरकार तर्फे जन्मशताब्दी निमित्ताने स्मृतिचिन्ह डाक तिकिटाचे विमोचन करून होणार आहे. या सोहळ्याला समितीचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोबरागडे अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून आ. विजय वड्डेटीवार (माजी विरोधी पक्षनेते, विधानसभा), आ. सुधीर मुनगंटीवार (माजी कॅबिनेट मंत्री), खासदार प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार व आ. सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष मारोतराव खोबरागडे असतील.
प्रबोधन सभा
सायं. ७:०० वाजता प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे अध्यक्षस्थान देशक खोब्रागडे भूषवणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत ज. वी. पवार (मुंबई) मार्गदर्शन करणार असून प्रमुख अतिथी रोहिदास राऊत (जेष्ठ रिपब्लिकन नेते, गडचिरोली) व अॅड. रामभाऊ मेश्राम (माजी नगराध्यक्ष, गडचिरोली) यांची उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन प्रा. नितीन रामटेके करतील तर स्वागताध्यक्ष किशोर सवाने असतील.
जाहीर परिसंवाद व समूह नृत्य स्पर्धा
शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी सायं. ५:०० वाजता प्रा. डॉ. विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर परिसंवाद होणार असून प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रदीप आगलावे मार्गदर्शन करतील. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मनोहर टेंभुरकर (तळोधी) उपस्थित राहणार आहेत. परिसंवादाचे उद्घाटन निर्मला नगराळे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष सत्यजित खोबरागडे असतील.
सायं. ७:०० वाजता बुद्ध भीम गीतांवर आधारित भव्य समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी पुण्याचे नामांकित उद्घोषक दिव्या सरकार उपस्थित राहतील.
समारोपीय कार्यक्रम : ‘जल्लोष भीमराजचा’
शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सायं. ५:०० वाजता जल्लोष भीमराजचा या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व संच (मुंबई) बुद्ध-भीम गीतांचा नजराणा सादर करणार असून अश्विनी रोशन व साची अलोने यांचा विशेष सहभाग राहणार आहे. उद्घाटन गीत गीता रामटेके करणार असून स्वागताध्यक्ष पद आर्किटेक्ट राजेश रंगारी भूषवणार आहेत.
पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेला प्रतीक डोर्लीकर, अॅड. राजस खोबरागडे, केशव रामटेके, अशोक टेंभरे, प्रेमदास बोरकर, राजूभाऊ खोबरागडे, शंकर वेल्हेकर, हरिदास देवगडे, मृणाल कांबळे, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकर, अश्विनी आवळे, वैशाली साठे, छाया थोरात, अनिता जोगे, दिलीप डांगे, प्रा. जे. टी. लोणारे, ज्योति साहरे, योगिता रायपुरे, महादेव कांबळे, अशोक फूलझले, मुन्ना खोबरागडे, विजय करमरकर, प्रभूदास माऊलीकर, संजय ढेपे, दिलीप वावरे, अनंत बाबरे, हर्षल खोबरागडे, अॅड. राजेश वनकर, अनिल आलोबे, डॉ. मुकुंद शेंडे, डॉ. टी. डी. कोसे, सचिन पाटील, राजकुमार जवादे, चेतन उंदीरवाडे, शिधार्थ शेंडे, कैलाश शेंडे, वसंत रंगारी, राजश्री शेंडे, शीला कोवले, लीना खोब्रागडे, सुनीता बेताल, पौर्णिमा जुलमे, समता खोब्रागडे, पौर्णिमा गोंगले, सौहण रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment