जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती - शहरातील यश राज बारमध्ये काम करणाऱ्या महिलेला तेथीलच काम करणाऱ्या युवकांनी हातावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना दिनांक १८ च्या रात्रौ दरम्यान घडली या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे .
विशाल हंसकार वय 35 वर्षे राहणार कडोली भद्रावती असे आरोपीचे नाव आहे तर प्रियंका विनोद गजभिये वय 32 वर्षे राहणार भद्रावती असे जखमे महिलेचे नाव आहे हे दोघेही विजासन रोडवरील यशराज बार येथे कामावर होते व तेथीलच मागच्या बाजूच्या रूममध्ये पती-पत्नी सारखे एकत्र राहत होते घटनेच्या दिवशी विशाल हा दारू पिऊन प्रियंकाशी वाद घालत होता त्या वादात त्याने प्रियंकाच्या हातावर चाकूने वार करून रक्तबंबाळ केले या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली . जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी विशाल हंसकार याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात सहाय्य पोलीस निरीक्षक केदारे करीत आहे.
0 comments:
Post a Comment