शेगाव (जावेद शेख) – पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे चारगाव बुद्रुक येथील राहणारा नितेश गौतम देठे (वय 32 वर्षे) हा आपल्या राहत्या घरात गांजा साठवून विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. crime news
Shegaon police action at Chargaon Budruk – 2 kg of ganja seized, accused arrested
सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने चारगाव बुद्रुक येथे धाड टाकली. दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेतली असता दोन पिशव्यांमध्ये पॅक केलेला एकूण 2 किलो गांजा मिळून आला.
याबाबत गुन्हा क्र. 167/2025, कलम 8(क), 20(ब) NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी नितेश गौतम देठे यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे (चिमूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव (ठाणेदार शेगाव), पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सहाय्यक फौजदार बंडू मोहुर्ले, पो.ह.वा. दिनेश ताटेवार, छगन जांबुडे, पोलीस अंमलदार प्रफुल कांबळे, ज्ञानेश्वर केकान, चालक रामेश्वर भिसे, प्रगती भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पो.उप.नि. सर्वेश बेलसरे, नितीन कुरेकर, नितीन साळवे, प्रमोद कोटणाके, गजानन मळावी व अमोल सावे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
🔹 शेगाव पोलिसांच्या तत्पर आणि काटेकोर कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्याला तुरुंगाचा रस्ता दाखविण्यात यश आले असून, पुढील तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment