Ads

घुग्घुस पोलिसांची जलद कारवाई — जबरी चोरी प्रकरणातील आरोपी अवघ्या दोन तासांत गजाआ

चंद्रपूर :
घुग्घुस पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सोडवून आरोपीला गजाआड करत फिर्यादीचा मोबाईल हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Gughus police take swift action - accused in extortion case arrested in just two hours
दिनांक 05 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी फिर्यादी महिला आपल्या कामावरून के.बी. खान कॉम्प्लेक्स समोरून पायदळ घरी जात असताना एका अनोळखी इसमाने तिचा पाठलाग करून अंधाराचा फायदा घेत तिचे तोंड दाबले, हात पकडून खाली पाडले. फिर्यादी ओरडल्याने त्या इसमाने तिच्याकडील मोटो जी-85 (5G) कंपनीचा मोबाईल (किंमत रु. 12,000/-) हिसकावून पसार झाला.

फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 198/2025 कलम 74, 75, 309(4) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी विशेष पथक तयार केले. तपासात कोणताही सुराग नसताना केवळ दोन तासांत आरोपीचा शोध लावून त्याला अटक करण्यात आली. तसेच आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला.

ही प्रशंसनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, सपोनी सचिन तायवाडे, सपोनी प्रफुल डाहुले, परि. पो. उपनि. गणेश अनभुले, पो.हवा. संजय आतकुलावार, अनील बैठा, पो.अं. नितीन मराठे, प्रसंनजित डोर्लीकर, रवि वाभीटकर, महेश भोयर, विजय ढपकास व पवन डाखरे यांनी केली.

👉 घुग्घुस पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात कायद्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment