चंद्रपूर / सचिन पाटिल–
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे दलित, शोषित व अस्पृश्य समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून, तीन लाख लोकांनी रक्ताचा एक थेंब न पडता धम्मक्रांती साध्य केली होती. ही पवित्र दीक्षाभूमी आज जागतिक स्तरावर ओळखली जाते.
Ambedkar activists demand from the District Magistrate to declare Dhammachakra Pravartan Day as a government holiday
मात्र, यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. या बाबत माहिती मिळताच जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील युवकांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यांनी मागणी केली की, १६ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, जेणेकरून जिल्ह्यातील बौद्ध, आंबेडकरी जनतेला आपल्या परिवारासह पवित्र दीक्षाभूमीला वंदन करण्याची संधी मिळेल.
या शिष्टमंडळात ॲड. राजस खोब्रागडे, प्रतिनिधी सचिन पाटील, ॲड. प्रियंका चव्हाण, कपिल गणवीर, प्रणित तोडे, हर्षल खोब्रागडे व एकता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment