Ads

*वंचित बहुजन आघाडी कडून राजुरा तालुका बंद*

*वंचित बहुजन आघाडी कडून राजुरा तालुका बंद*    राजुरा प्रतिनिधी:-  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय  राष्ट्रीय नेते श्रध्देय  बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे जंतरमंतर वर चालू असलेल्या सि जे पी चे आंदोलन , निट पेपर फुटी विरोधात सुरू असुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनामा घेण्यासाठी लोकशाही मार्गाने विद्यार्थी आंदोलन करत होते, परंतु दि, २० जुलै ला दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष पणे लाठीचार्ज केला, त्या मध्ये शेकडो विद्यार्थी घायल झाले, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते ऑडोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली.त्या मुळे वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा कडून राजुरा तालुका बंद करण्यात आला, या मध्ये काही सामाजिक संघटना तसेच शिक्षण बचाव समिती यांनी सुध्दा या बंद सामिल होऊन राजुरा बंद करण्यासाठी सहकार्य केले,या बंद मध्ये जय जय जय जय भीम, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं,वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, धर्मेंद्र प्रधान राजिनामा दो, या घोषणा देत राजुरा बंद करण्यात आला,या बंद चे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी चे राजुरा तालुका अध्यक्ष विजय जुलमे यांनी केले, तसेच जिल्हा सदस्य सच्चिदानंद रामटेके, तालुका महासचिव नागोराव पडवेकर, उपाध्यक्ष रुषी रायपुरे,मुरलीधर ताकसांडे, शंकर झाडे, शंकर दुर्गे,बाळू जुलमे,प्रभुदास वनकर, विठ्ठल धोटे, चरणदास झाडे, प्रविन वाघमारे, दिलीप जुलमे, दिलीप भसारकर,मंजुषाताई दुपारे, रंजनाताई ताकसांडे, तसेच इतर बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment