Ads

सहयोग मल्टीस्टेट उडान फाउंडेशन राजुरा शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप.

राजुरा, दि.४ जुलै :-
             शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या उद्देशाने सहयोग उडान फाउंडेशन व सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., राजुरा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट  येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. हा समाजोपयोगी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Distribution of school bags to students by Sahayog Multistate Udan Foundation Rajura branch.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. शालेय बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
यावेळी सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चंद्रपूर जिल्ह्याचे असिस्टंट डिस्ट्रिक्ट हेड वैभव ढोबळे, राजुरा शाखेचे शाखा व्यवस्थापक कपिल इटनकर, एसएमबीजी ट्रेनर रंजिता खडसे, बीडीओ (उडान टीएल) ज्योती वेलादी, बीडीओ अमर कोसरे, बीडीई विक्रांत मून तसेच राजुरा शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट चे मुख्याध्यापक जनार्धन मेश्राम, शिक्षक विष्णु जाधव, शाळेतील शिक्षकवृंद, मान्यवर अतिथी व ग्रामस्थांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाला सहकार्य केले.
यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहयोग उडान फाउंडेशन भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणार असल्याची माहिती देण्यात आली.
शिक्षण, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवा या क्षेत्रात कार्यरत असलेले सहयोग उडान फाउंडेशन समाजातील गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उपक्रम राबवत असून, या शालेय बॅग वाटप उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोग उडान फाउंडेशनच्या शीतल रामादे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट तसेच सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., राजुरा शाखेच्या संपूर्ण टीमचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment