Ads

🌱 डीजेला फाटा; ‘सिद्धिविनायक गणेश मंडळा’कडून १०१ वृक्षांची अनोखी भेट! DJ's break; Unique gift of 101 trees from 'Siddhivinayak Ganesh Mandal'!

गुळगाव (माल)भद्रावती चंद्रपूर :
गणेशोत्सव म्हटले की डीजे, मोठी साउंड सिस्टीम आणि अनावश्यक खर्च असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, गुळगाव (माल) येथील ‘सिद्धिविनायक गणेश मंडळा’ने याला अपवाद ठरत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला आहे. DJ's break; Unique gift of 101 trees from 'Siddhivinayak Ganesh Mandal'!
मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात डीजे व मोठ्या आवाजाची साउंड सिस्टीम न लावण्याचा निर्णय घेतला. डीजेवरील होणारा खर्च टाळून त्याच पैशातून गाव परिसरात तब्बल १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
🌳 ‘डीजे नाही, १०१ झाडे लावूया!’ या सामाजिक संदेशातून मंडळाने गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड दिली आहे. केवळ उत्सव साजरा न करता गाव, समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी विधायक करण्याचा मंडळाचा हा प्रयत्न विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
“गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा उत्सव न राहता समाज आणि पर्यावरणाला काहीतरी देणारा असावा,” या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील युवक व ग्रामस्थांनी वृक्षलागवडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, कमी खर्चातही सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविता येतात, हा संदेश सिद्धिविनायक गणेश मंडळाने आपल्या कृतीतून दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘ एक गणपती – एक सामाजिक संदेश’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मंडळाचा प्रयत्न ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरत आहे.

  “ डीजेचा आवाज नाही, १०१ झाडांचा हिरवा संदेश!” 
सिद्धिविनायक गणेश मंडळ, गुळगाव (माल) यांच्या या उपक्रमातून गणेशोत्सवाची सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधोरेखित झाला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment