चंद्रपूर : मोटारसायकल चोरी करून ती विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीची ऑरेंज रंगाची बजाज पल्सर एनएस १२५ मोटारसायकल (क्र. एमएच २६ सीटी ०७६०) असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Two-wheeler theft busted! 18-year-old accused in LCB's net; Stolen Pulsar worth ₹70,000 seized
दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शुभम बिरन जाधव (वय १८), रा. इंदिरानगर, रेल्वे पटरीजवळ, चंद्रपूर हा चोरीचे वाहन विक्री करण्याच्या उद्देशाने शासकीय दूध डेअरी परिसरात फिरत आहे.
माहितीच्या आधारे LCB पथकाने शासकीय दूध डेअरी परिसरात सापळा रचला. संशयित शुभम जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे पोलीस स्टेशन मूल गुन्हा क्र. ६३७/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. मधील चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल आढळून आली. पोलिसांनी सदर दुचाकी जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन मूलच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सपोनि बलराम झाडोकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोअं प्रतिक हेमके, पोअं विठ्ठल काकडे, पोअं प्रफुल पुष्पलवार व पोशी दिनेश अराडे यांनी सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment