वाघाच्या हल्ल्यात ७५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; सिंदेवाही तालुका हादरला!
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही -- तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी नवरगावजवळील धुमनखेडा येथे वाघाच्या हल्ल्यात पत्रू रामाजी मेश्राम (वय ७५) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेताकडे जात असताना गावानजीक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
75-year-old farmer dies in tiger attack; Sindewahi taluka shaken!
घटनेची माहिती मिळताच गावकरी, वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. विशेष म्हणजे, दोन-तीन दिवसांपूर्वीच भेंडाळा व पळसगाव जाट येथे वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
0 comments:
Post a Comment