जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ३१ ऑक्टोबर ला धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

राजुरा :-३१ ऑक्टोबर २००५ ला महाराष्ट्र शासनाने डीसीपीएस नावाच्या योजनेचा जिआर काढून १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर लागलेल्या सर्व विभागातील सर्व कर्मचारीवर्गाची हक्काची जुनी पेन्शन बंद केली. आज या घटनेला २१ वर्ष होत आहेत. जुनी पेन्शन योजना पूर्ववत जशीच्या तशी लागू व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या अकरा वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत वेळोवेळी सातत्याने आंदोलने करीत आहे.
A march will be held at the District Collector's Office on October 31 to demand old pension. वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने राज्य, जिल्हा पातळीवर २०१५ पासून केल्या जात आहेत. यात काही प्रमाणात संघटनेला यश पण मिळाले आणि मृत कर्मचारी यांचे परिवार सुरक्षित झाले. पण जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना अजूनपर्यंत लागू झालेली नाही. १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतरचे सर्व कर्मचारी आम्हाला १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या भूमिकेवर ठाम आहेत. ३१ ऑक्टोबर हा दिवस सर्व कर्मचारी यांच्यासाठी काळा दिवस आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने जुन्या पेन्शनच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर या दिवसाचा निषेध म्हणून "काळा दिवस निषेध आंदोलन" म्हणून या दिवशी शासनाचे जुन्या पेन्शनच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर असा मोर्चा काढत आहे. करिता जुन्या पेन्शनचा आवाज बुलंद करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचारी यांनी या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राजुरा तालुका पदाधिकारी महेश गोरे  अध्यक्ष, गणपत चव्हाण, सर चिटणीस, सुरेंद्र दारवटकर कार्याध्यक्ष, रामेश्वर नागरे कोषाध्यक्ष आदींसह शिक्षक व अन्य आस्थापनातील पेन्शन फायटर उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उप जिल्हा रुग्णालय राजुरा, सास्ती, भेंडवी केंद्र येथील शिक्षण परिषद सह राजुरा शहरासह तालुक्यातील शेकडो शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आंदोलनाची रूपरेषा आणि जनजागृती करण्यात आली. तसेच आंदोनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कृती समन्वय समिती चंद्रपूर करित आहे.
------------------------------------------
*कोट*
" ३१ ऑक्टोबर २००५ ला महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना बंद चा जिआर काढून आमची हक्काची जुनी पेन्शन बंद केली. त्यामुळे आमच्यासाठी हा काळा दिवस असल्याने या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापनेतील कर्मचारी काळा दिवस निषेध आंदोलन च्या माध्यमातून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहेत."
 - विपीन धाबेकर, जिल्हाध्यक्ष 
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर 
----------------------------------------------
*कोट*
३१ ऑक्टोबर २०२६ ला जुनी पेन्शन बंदच्या जीआर ला २१ वर्ष पुर्ण होत आहेत. त्यामुळे या दिवशी आम्ही काळा दिवस निषेध आंदोलन मोर्चा काढून शासनाने जशीच्या तशी १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता शासनाचे लक्ष वेधत आहोत.  
- लखन साखरे, जिल्हासचिव 
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर
---------------------------------------------
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment