प्रतिनिधी ; जावेद शेख भद्रावती
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वर्तुळातून एक महत्त्वाची नियुक्ती समोर आली असून, इम्रान अफजल रफिक खान यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश वाहतूक प्रकोष्ठाच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र जारी करून ही नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील भाजपच्या राजकीय वर्तुळात इम्रान खान यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.Imran Afzal Rafiq Khan appointed as regional co-convenor of BJP's transport cell; sparks discussion in political circles!
इम्रान खान यांनी यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.
युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले असून, युवकांशी संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. युवा मोर्चातील त्यांच्या कार्यानुभवाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्याकडे प्रदेशस्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवीन नियुक्तीनुसार त्यांच्याकडे पूर्व विदर्भातील वाहतूक प्रकोष्ठाच्या प्रदेश सहसंयोजकपदाची जबाबदारी राहणार आहे. या माध्यमातून पूर्व विदर्भातील संघटनात्मक विस्तार, वाहतूक क्षेत्राशी संबंधित घटकांशी समन्वय आणि पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
विशेष म्हणजे, युवा मोर्चातील विविध पदांवर काम केल्यानंतर प्रदेश वाहतूक प्रकोष्ठात मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या संघटनात्मक राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
स्थानिक स्तरावरून प्रदेशस्तरापर्यंत मिळालेल्या या संधीमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देणार इम्रान खान..
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इम्रान खान म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवत वाहतूक प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदाची जबाबदारी सोपविली, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने काम करणार आहे.
पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, त्या जबाबदारीला योग्य न्याय देत पूर्व विदर्भात संघटनात्मक कार्य अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणे, हेच माझे ध्येय राहील. माझ्या नियुक्तीसाठी विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो."
इम्रान खान यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार करण देवतळे, आमदार बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रदेश संयोजक योगेश मैद , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, चंद्रकांत गुंडावार, भाजप शहराध्यक्ष किशोर गोवरदिपे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी नगरसेवक अफजलभाई, नगरसेवक वृषाली पांढरे, नगरसेवक कविता सावनकर, यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
युवा मोर्चातील कार्यापासून प्रदेशस्तरीय जबाबदारीपर्यंतचा इम्रान खान यांचा प्रवास आता नव्या टप्प्यावर पोहोचला असून, पूर्व विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक राजकारणात या नियुक्तीची चर्चा होत आहे.
0 comments:
Post a Comment