राजुरा, दि.२२ नोव्हेंबर
राजुरा तालुक्यातील गोयेगाव फाट्याजवळ सुरू असलेल्या हेवनली कोलवॉशरीमधून होणाऱ्या धूळ प्रदूषणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कोलवॉशरीमधून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, शेतीपिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार माथरा ग्रामपंचायतीचे सरपंच हरिदास झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.Pollution report of Heavenly Coal Washery.
जूया तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २०) कोलवाशरी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात करण्यात आलेल्या पंचनाम्यात शेतपिकांवर धुळीचा परिणाम होत असल्याचे तसेच कोलवॉशरीत ये-जा करणाऱ्या कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यालगत धुळीचे कण मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे नमूद करण्यात आले. गोयेगाव फाट्याजवळ असलेल्या या कोलवॉशरीत मोठ्या प्रमाणावर कोळशाची साठवणूक आणि वाहतूक केली जाते. वॉशरि परिसरातील कोळशाचे ढिगारे तसेच सततची अवजड वाहतूक यामुळे धुळीचे कण परिसरात पसरत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली होती. परिसरातील शेतपिकांवर धुळीचा थर साचत असल्याने पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होत असल्याचे सरपंच हरिदास झाडे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यामुळे या पंचम्यानंतर रस्त्यावर धूळ साफ करणे, पाणी मारणे असे तात्पुरते उपाय सुरू झाले. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
0 comments:
Post a Comment