Ads

चंद्रपूरचा अक्षय झळकतोय मी पण सचिन या चित्रपटात

khabarbat.in

khabarbat.in

नागपूर/ प्रतिनिधी

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की सपने वो नही होते जो निंद मे आते हैं..  सपने वो होते है, कि जीने पुरे किया बिना नींद ना आये.. खरं तर असच एक स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण करण्याची जिद्द चिकाटी ज्या युवकांमध्ये होती, असा एक युवक म्हणजेच चंद्रपुर जिल्ह्यातला पोंभूर्णा तालुक्यातला चेक फुटाणा या गावचा... यांनीही आपल्या बाल वयात असच एक स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न आता स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरणार आहे ते येत्या १ फेब्रुवारी २०१९ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात...मी पण सचिन या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या स्वप्निल जोशी सोबत सहाय्यक अभिनेता म्हणून आता अक्षय लोणारे सुद्धा आपल्याला दिसणार आहे.... आजपर्यंत अक्षयने नाट्य,एकपात्री प्रयोग व चित्रपट क्षेत्रात अनेक भूमिका मधून आपल्याला दिसतो आहे...या आधी अक्षयने मॅरेथॉन जिंदगी, आयटमगिरी  या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत  ...तसेच अक्षयला त्याच्या लहानपणापासूनच अभिनयाची आवड असून शिक्षणाबरोबरच अभिनयाचे धडे सुद्धा अक्षय घेत होता...  अक्षयने जवळपास एक हजार पेक्षा जास्त झाडीपट्टी व पुण्यामुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी नाटकांचे व एकपात्री  प्रयोग सादर केले आहेत... श्रेयस जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये आहेत...  स्वप्निल जोशी, प्रियदर्शन जाधव, अभिजीत खांडगेकर, अविनाश नारकर,कल्याणी मुळे,अनुजा साठे हे असून अक्षय लोणारे मी पण सचिन या चित्रपटात गुलाब नावाच्या क्रिकेटरची भूमिका साकारतो आहे..आशिष नरखेडकर यांनी अक्षय ला चित्रपट क्षेत्रात मदत केली असून, पुणे फिल्म कास्टिंग हाऊसचे सचिन वाडकर यांनी अक्षय ची या चित्रपटासाठी निवड केली... आपण चंद्रपूरकरांनी अक्षय चा हा चित्रपट बघून भरभरून प्रतिसाद द्यावा... अक्षय ला त्याच्या मी पण सचिन या चित्रपटाकरिता अक्षयची आई छाया लोणारे व माधुरी बोम्मावार, सोनू तूंगिडवार,अनिकेत दुर्गे,जावेद सर,अरुण झगडकर,सुनील कोहपरे ,शुभम रे,  गणेश पायघन ,अमोल ठेंगणे, उद्धव बोबडे, ईश्वर अर्जुनकर, सूर्यकांत लखमापूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment