हजारो तारणतरण दिगंबर जैन समाजाची उपस्थित
धुळे/मनिषा कोचर, खबरबात /
शिरपूर शिरपूर येथील तारणतरण जैन दिगंबर मंदिराचे श्री जिनवाणी अस्थाप कलश व कलशारोहण बेदी प्रतिष्ठा तिलक महोत्सवाची सुरुवात (ता.२९ ते ३१ जानेवारी या तीन दिवसीय चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमा निमित्ताने तारततरण जैन धर्मियांचे गुरुवर्य परमपूज्य बसंतजी महाराज यांचे (ता. २६ ) रोजी दुपारी साडेचार वाजता रामसिंग नगर येथील अमरचंदजी , अजयचंदजी जैन यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर तेथून सायंकाळच्या आहार ग्रहण केल्यानंतर परमपूज्य बसंतजी महाराज यांची सवाद्य वाजंत्रीत रामसिंग नगर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तारततरण समाजातील नवयुवक मंडळ व कन्यामंडळ तसेच महिलांसह पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बसंतजी महाराज आए है , नई रोषणी लाऐ है , आज का दीन कैसा है , सुन्ने से भी मेंगा है अशा विविध घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.
शहरातील मुख्य मार्गावर स्वगताच्या कमानी लावलेल्या दिसूत येत होत्या शोभायात्रा रामसिंग नगरातील मुख्य बाजार पेठेतून विजयास्तंभा मार्गाने पारधीपुरा येथील तारणतरण जैन दिगंबर मंदिरात समारोप करण्यात आली
*जैन दिगंबर मंदिराच्या बेदी प्रतिष्ठा प्रसंगी आत्मार्थी साधक युवा रत्न श्रध्देय बा.ब्र.श्री आत्मानंदजी महाराज , श्रध्देय बा.ब्र. श्री परमानंदजी महाराज , श्रध्देय बा.ब्र. श्री मुक्तानंदजी महाराज , इतिहास रत्नाकर आध्यात्मरत्न बा.ब्र.श्रध्देय श्री बसंतजी महाराज , श्रध्देय बा.ब्र.श्री चिदानंदजी महाराज व साध्वीत बा.ब्र. अभयश्रीजी बहिणजी , बा.ब्र.जिनश्री बहिणजी , बा.ब्र.समयश्री बहिणजी , बा.ब्र. ममलश्री बहिणजी , बा.ब्र.विंदश्री बहिणजी , बा.ब्र.सरला बहिणजी , बा.ब्र. सुषमा बहिणजी यांच्या सह आदी महाराजांचे व साध्वीश्रीजी मार्गदर्शन लाभणार असून कार्यक्रमात प्रवचन ऐकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल तारणतरण जैन समाजाने केले आहे तीन दिवसीय कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरातसह विविध प्रांतातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. कार्यक्रमा यशस्वीसाठी सकल तारततरण दिगंबर जैन समाज कामाला लागले आहे.
0 comments:
Post a Comment