वाडीत संत गाडगे बाबा बहुद्देशीय संस्थेचा मकर संक्रांत उत्सव
नागपूर/अरूण कराळे:
आजच्या आधुनिक यंत्रयुगात संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा कालबाह्य गोष्टी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आज आपण जे सण साजरे करतो ते हौस म्हणून करतो की त्यामागील धार्मिक हेतू जाणून करतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. व्यवस्थापन कौशल्य, कलाकुसर दिसते. तसेच वैचारिक /बौद्धिक देवाण घेवाण होते म्हणून हा सण आपण साजरा करतो . उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता, कविवृत्ती जागृत होते व हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी-कुंकू करावे. चूल आणि मूल यातून स्त्रियांनी बाजूला होऊन एकत्र यावे. आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरतंय याचा विचार एकत्र आल्यामुळे होऊ शकतो. असे मार्मीक विचार संत गाडगे बाबा बहुद्देशीय संस्थेच्या महीला प्रमुख ज्योती भोरकर यांनी केले .वाडी,दत्तवाडी,डिफेन्स व लाव्हा परिसरातील धोबी समाजातील नागरीकांचा सामाजीक व सांस्कृतीक विकासाकरीता कार्यरत संत गाडगे बाबा बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आमसभा व महिलांसाठी मकर संक्रांत उत्सव कार्यक्रम संपन्न झाला . यानिमीत्ताने महीलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला .
सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला नगरसेवक श्याम मंडपे , मंडळाचे अध्यक्ष भीमराव भोरकर,उपाध्यक्ष तुकाराम शिरसागर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले . प्रास्ताविकतेतून मंडळाचे सचिव विजय शिरसागर यांनी मंडळाने वर्षभर केलेले कार्य व जमाखर्च याची माहीती दिली . कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात मंडळाची महिला प्रमुख ज्योती भोरकर यांच्या अध्यक्षतेखाली महिलांनी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले. आयोजकांतर्फे महिलांना भेटवस्तू देण्यात आले. संचालन नम्रता चांदेकर व आभार प्रदर्शन वंदना केळझळकर यांनी केले. यावेळी भगवान सावरकर, गणपत काळे,सुरेश माहुलकर,खांबलकर, राजू मोगरकर,सुरेश गवळी,राजू गवळी, प्रमोद शिरपूरकर,प्रफुल सावरकर, भोलाशंकर शिरसागर,प्राणिकेत चतुरकर, मनोज सावरकर,मोरेश्वर केळझळकर,समीर माहुलकर,शोभा शिरसागर,इंदिराताई शिरसागर,नलिनी शिरसागर आदी प्रमुख्याने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment