लोकसंघर्ष कृती समितीच्या वतीने विराट धरणे आंदोलन
चिमूर /रोहित रामटेके
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चिमूर क्रांती सह चिमूर तहसील चे नाव फार महत्त्वपूर्ण म्हणून नोंदवले गेले होते देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी राजकारणी लोकांच्या चकवाचकवी या धोरणामुळे चिमूर तहसीलतील शेती सिंचन भयानक बेरोजगारी भूमिहीन च्या झोपडपट्टीवासीयांच्या समस्या ओबीसीचे आरक्षण अनुसूचित जाती-जमातीच्या समस्या अजूनही सोडवणूक झालेली नाही. याकरिता समस्याग्रस्त लोकांच्या लोक संघर्ष कृती समिती च्या वतीने धरणे आंदोलन दिनांक 28 जानेवारीला तहसील कार्यालय च्या बाहेर घेण्यात आले त्याच्या प्रमुख मागण्या निवडणूक जाहीरनामा नुसार निवडून आल्यावर जाहीरनाम्याची अमलबजावणी सहा महिन्यात न केल्यास संबंधित आमदार-खासदारांचे सभासदत्व रद्द करण्याचा तातडीने कायदा करण्यात यावा, चिमूर तहसील च्या संपूर्ण शेती सिंचनास मंजुरी प्रमाणे कोरा धरण घोडाझरी धरण वुमन प्रकल्प आणि मोखा बर्डी उपसिंचन याचे पाणी मिळण्याची तातडीने व्यवस्था करावी, सन 1990 पासून च्या जगरान धारकांना शेती आणि सरकारी जागेवरील झोपडपट्टीवासीयांना याचे मालकी हक्काचे पट्टे देण्या ची व्यवस्था करावी, शेतकऱ्याचे अपघाती निधन झाल्यास कुटुंबियांना 25 लाख रुपये आणून द्यावे किंवा कुटुंबातील सक्षम सदस्यांना सरकारी नोकरी दयावी, नेरी परिसरातील सर्वांच्या सोयीसाठी नेरी येथे तहसील कार्यालयाची तातडीने व्यवस्था करावी, ओबीसी या समाज घटकांचे तातडीने जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षणात वर्ग 1, 2, चा नोकरीत आरक्षण देण्यात यावे , जंगली जनावरा पासून व हिस्त्र पशूपासून शेतकरी शेतमजुरांना संरक्षण मिळावे याकरिता अभयारण्यांना संरक्षण भिंत तातडीने बांधावी , निवडणूक जाहिरनाम्याप्रमाणे वेगळे स्वतंत्र विदर्भ राज्य देण्यात यावे, 58 वर्षे वरील वयोगटाच्या शेतकरी शेत मजुरास वाढती महागाई लक्षात घेऊन दरमहा दहा हजार रुपये पेन्शन तातडीने मंजूर करावे ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक व प्रभावीपणे अमलबजावणी करावी, शेतीमालाला शासनाचे वतीने तातडीने हमीभाव देणे सुरू करावे इत्यादी मागण्या , घेऊन चिमूर तहसीलदाराच्या माध्येमातून शासन दरबारी पोहचावा त्या करिता पुर्तीचे निवेदन तहसीलदारास देण्यात आले ,
यावेळी माजी मुख्य संयोजक विदर्भ राज्य आंदोलन समिती अध्यक्ष राम नेवले, माजी राज्य मंत्री रमेश कुमार गजभे,चिमूर लोकसंघर्ष कृती समितीचे अध्यक्ष नारायणराव बळगे, उपाध्यक्ष रामदास चौधरी, नारायणराव सावसागडे, कोषाध्यक्ष एकनाथ गोगले, महासचिव रवी नागदेवते, सचिव हुसेन अजानी, सचिव हरिदास दुधनकर, व तालुक्यातील नागरिक व शेतकरी वर्ग शेत मजूर उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment