चिमूर, (सुरेश डांगे)
चिमूर नगर परिषद क्षेत्रात भीषण पाणी टंचाई निर्माण असताना सत्ताधारी व विरोधक मात्र एकमेकांत आरोप व प्रत्यारोप मध्येच आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्या प्रभागातील जल समस्या सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वखर्चातून जनतेला पाणी पुरवठा करण्याचे सांगत आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी शासनानाकडून आलेली 51 कोटी ची पाणी पुरवठा योजना काही नगरसेवकांच्या स्वार्थी प्रवृत्ती जोपासत ती योजना न्यायालयात रखडली असल्याने त्याचा जनतेला पाण्याचा त्रास होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बंडे यांनी केले .
चिमूर नगर परिषद च्या प्रभाग 11 मध्ये भीषण पाणी टँचाई निर्माण झाली असताना नगर परिषद दुर्लक्ष करीत असताना इतर प्रभागात पाणी पुरवठा टँकर ने सुरू असताना आमच्या प्रभागात टँकर आला नसल्याने याची या प्रभागाच्या नगरसेविका सौ श्रद्धा
प्रदीप बंडे यांनी त्रिव खेद व्यक्त केला तेव्हा येथील सामाजिक युवा कार्यकर्ते प्रदीप बंडे यांनी नगर परिषद च्या अनियमित कार्यप्रणाली वर तोफ टाकीत नाराजी व्यक्त केली आणि सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या स्वखर्चातून जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर ने सुविधा उपलब्ध
केली त्यामुळे प्रभाग11 मधील जनतेला पाणी मिळाले .
चिमूर नगर परिषद मध्ये आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी शासनाकडून 51 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आणली होती तेव्हा काही विरोधक यांनी सत्तेतील काही नगरसेवकाना हाताशी धरुन कमिशन स्वार्थासाठी ती योजना कार्यान्वित न होता न्यायालयात रखडली गेल्याने जनतेला आज भीषण पाणी टंचाई ला सामोरे जाऊन बेहाल भोगावे लागत आहे याला दोषी कोण ?असे प्रदीप बंडे म्हणाले की जनतेची पाणी सोडविण्यासाठी सत्ता व विरोधक आरोप प्रत्यारोप च्या फैरी झाडत असून त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्व खर्चातून जनतेला टँकर ने पाणी द्याल का ? असा प्रश्न उपस्थित केला .51 कोटी च्या योजनेत राजकारण केले नसते तर आज पाणी टँचाई झाली नसती आणि ज्या प्रभागात पाणी जात नाही त्या प्रभागात पाणी गेले असते .
नगर परिषद प्रभाग 11 मधील जनतेला स्वखर्चातून टँकर ने पाणी पुरवठा करीत असताना सामाजिक युवा कार्यकर्ते प्रदीप बंडे यांनी नप वर रोष व्यक्त करीत आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेला पाणी पुरवठा स्वखर्चातून करण्याचा सल्ला दिला .
0 comments:
Post a Comment