Ads

मनपा अधिकाऱ्यांनी केला चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत


चंद्रपूर
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे तांत्रिक अडचणीं मुळे शहराच्या काही भागात दिवसासाठी बंदझालेला पाणीपुरवठा पुर्वरत करण्यात आला असून तुकूम जलशुद्धीकरण झालेला बिघाड रात्रभरात पालिकेतर्फे दुरुस्त करण्यात आला आहे. शहराच्या तुकूम जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने चंद्रपूर शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंदहोता यामुळे नागरीकांची होणारी अडचण लक्षात घेता आयुक्त संजय काकडे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगीरवींद्रकळंबे, नरेंद्र पवार, अतुल टिकले यांनी अहोरात्र काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. येत्या - दिवसातसंपूर्ण चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.      
 तुकूमजलशुद्धीकरण केंद्राच्या रोहित्रामध्ये  तांत्रिकबिघाड झाल्याकारणाने चंद्रपूर शहरातील किल्याचा आतील भाग वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाकरीता बंदहोता. मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना होणारा  त्रासलक्षात घेता संपूर्ण रात्र अहोरात्र काम करून दोन्ही पंप सुरु करण्यात यश मिळविले आहे. त्यानुसार आता संपूर्ण चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तांत्रिक बाबीं उलगडणे सहज सोपी नसतांना सुद्धा मनपा अधिकाऱ्यांनी संपूर्ण रात्र ड्युटीवर राहून  पाणीपुरवठाकरणारे पंप सुरू करण्यात यश मिळविले आहेशासकीयसुट्टीचा लाभ घेता उन्हाळ्याच्यादिवसात मनपा कर्मचारी काम करतात, संपूर्ण देशात सगळ्यात उष्ण शहराची नोंद चंद्रपूर शहराची आहे त्यानुसार पाणीपुरवठ्याची समस्या इतर शहरांपेक्षा  अधिकअसणे अपेक्षित असतांना सुद्धा चंद्रपूर मनपातर्फे जबाबदारीने काम करून पाण्याच्या समस्येची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.    

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment